BNR-HDR-TOP-Mobile

Pune : पीएमपीएमएलला भर रस्त्यात शॉर्टसर्किटने आग, जीवितहानी नाही

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पुण्यात हडपसर मधील रामटेकडी चौक परिसरात भर रस्त्यात पीएमपीएमएलच्या बसला शॉर्टसर्किटने अचानक आग लागली अग्निशमन दलाने तत्परतेने ही आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते.

पीएमपीएमएलच्या बस शहरात अनेक वेळा वेगवेगळ्या कारणांनी भर रस्त्यात बंद पडतात त्यामुळे प्रवाशांचे हाल होतात बऱ्याच वेळा प्रवाशांनाही पी एम पी एम एल ला धक्का देऊन सुरू करण्याची वेळ येते अशा अनेक घटनांनी पुणेकर नेहमीच संताप व्यक्त करतात परंतु पीएमपीएमएल प्रशासन आयुष्यमान संपलेल्या बस रस्त्यावर आणण्यापूर्वी प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि सोयीचा विचार केव्हा करणार हे आता येणारा काळच सांगेन.

HB_POST_END_FTR-A2

.