Baramati : बारामती, शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रचार कसा करायचा?

एमपीसी न्यूज – आगामी बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात (Baramati) राष्ट्रवादीचा उमेदवार उभा राहणार आहे. त्यामुळे आम्ही या पक्षाचा प्रचार तरी कसा करायचा? असा सवाल भाजपच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. महायुतीमुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीचा प्रचार करावा लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचे वरिष्ठ नेते स्थानिक कार्यकर्त्यांना ताकद देत नसल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढू लागला आहे. त्यामुळे बारामती, शिरूरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला साथ देऊन युती धर्म पाळायचा, की धडा शिकवायचा, असा राजकीय पेच निर्माण झाला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरूर लोकसभा मतदारसंघांतील कार्यकर्त्यांची आढावा बैठक पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत नुकतीच झाली.

त्यामध्ये पदाधिकाऱ्यांनी भावना मांडून परिस्थितीची जाणीव करून दिली. लोकसभेची ही निवडणूक नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी लढविली जात आहे. ज्या कार्यकर्त्यांना मोदींना पंतप्रधान करण्यासाठी काम करायचे आहे. त्यांनी काम करावे. ज्यांना काम (Baramati) करायचे नाही, त्यांनी अन्य पक्षात जावे किंवा घरी बसावे,’ अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी या कार्यकर्त्यांना सुनावले.

Pune: स्वच्छता ही जीवनपद्धती म्हणून स्वीकारावी – डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार

त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बाहेरून येणाऱ्या कार्यकर्त्यांना भाजपतर्फे ताकद दिली जाते. मात्र, वर्षानुवर्षे काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. महादेव जानकर, गोपीचंद पडळकर यांना भाजपने मोठी ताकद देऊन पदे वाटप केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.