Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेला खेडमध्ये मोठा प्रतिसाद

एमपीसी न्यूज : भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ संपूर्ण खेड तालुक्यातून रविवारी (दि. १३ नोव्हेंबर रोजी ) काढण्यात आलेल्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या यात्रेचे राजगुरुनगर, चाकण , आळंदी मध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व पुरोगामी विचारांच्या संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संखेने सहभागी झाले होते. या वेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Vallabhnagar Fire news: वल्लभनगर येथील बंद घरात लागली आग

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला समर्थन देण्यासाठी राजगुरूनगर पासून चाकण ते आळंदी अशी पदयात्रा काढण्यात आली होती. खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या वंदना सातपुते, कॉंग्रेसचे प्रवक्ते निलेश कड पाटील, चाकण शहराध्यक्ष, आनंद गायकवाड, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष जमीर काझी, राम गोरे, कुमार गोरे, सरफराज सिकीलकर, मुबीन काझी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संध्या जाधव, अमोल दौंडकर, काळूराम कड, बाळासाहेब पठारे, अशोक जाधव, सतीश राक्षे, विलास कातोरे, अस्लमभाई सिकीलकर, अमोल जाधव, दत्ता गोरे, अशोक बिरदवडे, अनिल देशमुख, नवनाथ शेवकरी, दीपक मांडेकर, दीपक थिगळे, डॉ. विजय गोकुळे यांच्यासह अनेक वकील, डॉक्टर यांच्यासह महविकास आघाडी पदाधिकारी, नागरिक , सामाजिक कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.