Children’s Day Celebration: बाल दिनानिमीत्त रिता इंडिया फाउंडेशन तर्फे “खुशियो के पल, बच्चो के संग” कार्यक्रम साजरा

एमपीसी न्यूज – बाल दिनाचे औचित्य साधत रिता इंडिया फाउंडेशन तर्फे “खुशियो के पल, बच्चो के संग” हा कार्यक्रम रवीवारी (दि.14) श्रीलोचन बालविकास केंद्र, आंबेगाव खुर्द पुणे येथील मुलांबरोबर उत्साहात साजरा करण्यात आला.

रिता इंडिया फाउंडेशन च्या अध्यक्षा डॉ. रिता शेटीया आणि त्यांच्या टीमने विविध खेळ , ॲक्टिविटी घेऊन मुलांमधील विविध गुण खेळा द्वारे दाखवण्यात आले. सर्व मुले आणि मुलींना बिस्किट्स, चॉकलेट्स आणि शालेय साहित्य वाटप संस्थेच्या विश्वस्त संस्थापिका एच.सी.डॉ . सविता शेटीया यांच्या हस्ते करण्यात आले. मुलांनी प्रत्येक ॲक्टिविटी आणि खेळात सहभाग घेऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला.

Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेला खेडमध्ये मोठा प्रतिसाद

रिता इंडिया फाउंडेशन नेहमीच गर्ल वूमन आणि युथ एम्पॉवरमेंट तसेच मेडिकल इमरजन्सी साठी निधी जमवणे. कोवीड काळात कर्मचारी वर्ग, तृतीय पंथीय, दीव्यांग यांना जवळपास 1500 अन्नधान्य किट चे वितरण करण्यात आले. अश्या विविध उपक्रमांसाठी कार्य करत असते. अश्या प्रकारचे सामाजिक कार्य करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आव्हान डॉ. रिता शेटीया यांनी केले.

या कार्यक्रमास आर्थिक सहाय्य आणि मोलाची साथ दिली ती अंशुमन एज्युकेशनल वेलफेअर सोसायटी इंडिया, डॉ. मालती रॉय, वास्तू शिल्प चे डायरेक्टर मंगेश वाघमारे आणि सचिन सकपाळ , सुप्रिया सातवेकर, चित्रा पनमड, उद्धव चव्हाण, संतोष गेडाम, शोभा गायकवाड , विद्या साठे, रूतुजा कणसे, जिगीशा चावडा, रश्मी सुरे, प्राजक्ता चांदेकर, प्राची बडवे, राहुल सुतार , कमलेश पोखरणा आणि अनुजा गडगे यांनी दिली.

यावेळी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य ब्रम्हांड संस्थान सामाजिक राष्ट्रसेवा, कात्रज चे अध्यक्ष चारुहास रेडकर आणि श्री लोचन बाल विकास केंद्राचे प्रोजेक्ट कोऑर्डीनेटर नागेश पवार, निकिता कंटाले, संगीता वळवी, रेश्मा चव्हाण आणि निवेदिता माझिरे, मयुरी महाकाळकर, आकांक्षा गिरी, शिवानी बनकर, आणि सुनील कणसे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.