Maval : मावळ काँग्रेस कमिटीतर्फे बाल दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – मावळ तालुका काँग्रेस कमिटीच्या (Maval) वतीने 14 नोव्हेंबर हा बाल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार मावळ तालुक्यामध्ये बालदिन साजरा करण्याचे योजले असून लहान मुलांमध्ये विश्व निर्माण करण्याची शक्ती असल्याने योग्य वेळेतच मुलांना दिशा द्यायला हवी असे प्रतिपादन मावळ तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी केले आहे.

याप्रसंगी मावळ तालुका युवक अध्यक्ष राजेश वाघोले, तळेगाव युवक अध्यक्ष समीर दाभाडे, गणेश मोहोळ, संजय बनसोडे, ॲड राम शहाणे, व बहुसंख्य कार्यकर्ते तसेच एकता निराधार केंद्र कान्हे येथील विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्य प्रमाणात उपस्थित होते.

एकता निराधार संस्था कान्हे येथील अनाथ मुलांच्या सहवासात काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी बाल दिन साजरा केला . मावळ तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी एकता निराधार केंद्रातील मुलांना मिठाई व फळ वाटप करून बालदिन उत्साहात साजरा केला.

Pimpri : छठ पूजा उत्सवास उद्यापासून प्रारंभ

एकता निराधार संस्थेचे प्रशिक्षक लिखित नाशिककर यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. एकता निराधार संस्था ही अत्यंत प्रामाणिकपणे मुला मुलींसाठी कार्यरत असून मुलांचे भविष्य घडवण्याची क्षमता संस्थेमध्ये आहे, मनुष्य कितीही मोठा झाला तरी मनाने मुलांविषयी कळवळा असणे खूप महत्त्वाचे असल्याचे मावळ तालुका काँग्रेस कमिटी चे प्रवक्ते मिलिंद अच्युत यांनी केले आहे.

याप्रसंगी मावळ तालुका काँग्रेस कमिटीचे युवा नेते गणेश मोहोळ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.  (Maval ) मुला, मुलींनी गणेश मोहोळ यांना भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

तळेगाव शहर काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष योगेश पारगे यांनी आभार मानले. पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रोहिदास वाळुंज यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.