Alandi : पत्नीचा फोटो आणि मोबाईल नंबर कॉलगर्ल म्हणून सोशल मीडियावर व्हायरल करणा-या पतीवर गुन्हा

एमपीसी न्यूज – पतीला दारूचे व्यसन असल्यामुळे पत्नी नांदण्यास येत नव्हती. यामुळे पतीने पत्नीचा अश्लील फोटो आणि मोबाईल नंबर सोशल मीडियावर कॉलगर्ल म्हणून व्हायरल केला. याबाबत पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 8 ऑक्टोबर 2019 ते 29 फेब्रुवारी 2020 या कालावधीत मरकळ येथे घडली.

याप्रकरणी 21 वर्षीय पीडित पत्नीने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तिच्या पतीविरोधात विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 67 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीला दारूचे व्यसन होते. त्यामुळे फिर्यादी पत्नी त्याच्याकडे नांदण्यास जात नव्हती. त्यामुळे चिडून पतीने पत्नीचा फोटो आणि मोबाईल नंबर कॉलगर्ल म्हणून सोशल मीडियावर व्हायरल केला. पत्नी कॉलगर्ल म्हणून देहविक्रीचा व्यवसाय करत असल्याचे भासविण्यासाठी आरोपी पतीने पत्नीचा चेहरा वापरून अश्लील फोटो तयार केला. तो फोटो पत्नीचे मामा व भावाला पाठवला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.