Wakad : पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

एमपीसी न्यूज – सासूच्या नावावरील जमीन स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी पत्नीने पतीला शारीरिक व मानसिक त्रास दिला. मेहुण्याने वारंवार पैसे घेऊन कर्जबाजारी केले. पत्नी आणि सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केली. न्यायालयाने याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर वाकड पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त  केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुमन महादेव नवले (वय 55, रा. ताथवडे) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शिवांजली सुनील नवले (वय 23), महादेवी रामदास चौरे (वय 45), सत्यवान रामदास चौरे (वय 24), शिवरात्न रामदास चौरे (वय 23) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील महादेव नवले (वय 25) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमन यांनी त्यांच्या नावावर जमीन खरेदी केली होती. ती जमीन आपल्या नावावर करून घेण्यासाठी सुनील यांची पत्नी शिवांजलीने सुनील यांना वारंवार शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. तसेच पत्नी इतर पुरुषांसोबत वारंवार बोलत होती. सुनीलचे काहीही ऐकत नव्हती.

शिवांजलीचा भाऊ सत्यवान आणि शिवरात्न या दोघांनी सुनील यांच्याकडून वारंवार पैसे घेतले. वारंवार पैसे घेऊन सुनील यांना कर्जबाजारी केले. त्यासाठी सुनील यांच्या सासूने मदत केली. या त्रासाला कंटाळून सुनील यांनी 11 जून 2016 रोजी राहत्या घरी आत्महत्या केली.

याबाबत सुनील यांच्या आईने शिवाजीनगर न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने याप्रकरणावर सुनावणी देत सुनील यांची पत्नी, सासू आणि दोन मेहुण्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वाकड पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.