BNR-HDR-TOP-Mobile

Dehuroad : टपरी फोडून हजारोंचा माल चोरला

0
INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – चोरट्यांनी टपरी फोडून टपरीमधून १४ हजार रुपयांचा माल चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 10) पहाटे सेंट्रल चौक, देहूरोड येथे घडली.

अमीन मोहम्मद शेख (वय 42, रा. मामुर्डी, देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख यांची देहूरोड मधील सेंट्रल चौकात टपरी आहे. बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांची टपरी फोडली. टपरी फोडल्याचे बाजूच्या हॉटेल मालकांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ शेख यांना फोन करून बोलावून घेतले.

शेख यांच्या टपरीमधून परफ्युम, किचन, बिस्कीट पुडे, चॉकलेटचे पुडे असे कटलरी सामान आणि रोख रक्कम असा एकूण 14 हजारांचा माल चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A1
.