Pune : मला घराणेशाही मान्य – खासदार सुप्रिया सुळे

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसच्या 24 व्या वर्धापनदिनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर कार्यकारी अध्यक्षाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्यावर विरोधकांकडून घराणेशाहीचा आरोप करण्यात येत आहे.

Pimpri : पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीच्या वतीने 25 वा वर्धापन दिन साजरा

त्याच दरम्यान सुप्रिया सुळे या पुणे (Pune) दौर्‍यावर होत्या. त्यावेळी घराणेशाही बाबत विचारले असता. त्या म्हणाल्या की, मी पक्षाचे सर्व कार्यकर्ते, नेते, पवार साहेब यांचे आभार मानते. माझ्यावर एवढा मोठा विश्वास टाकला. मी प्रफुल भाई आणि पवारसाहेबांना रिपोर्ट करणार आहे. तसेच मी राज्यात अजित दादा, भुजबळ साहेब आणि जयंत पाटील यांना रिपोर्ट करणार आहे.

दादा हा राज्यातील विरोधी पक्ष नेता असून हे पद मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीच आहे. घराणेशाही आहे आणि ते मला मान्य आहे. माझा ज्या घरात जन्म झाला. मी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांची मुलगी आहे. त्याबद्दल मला सार्थ अभिमान असल्याची भूमिका यावेळी त्यांनी मांडली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.