ICC Test Ranking: आयसीसी कसोटी क्रमवारीत विराट दुसऱ्या तर बाबर आझम पाचव्या स्थानावर

ICC Test Ranking: Virat is second and Babar Azam is fifth in the ICC Test rankings पाकिस्तानचा बाबर आझम पाचव्या स्थानावर आला आहे. याचसोबत बाबर आझम तिन्ही फॉरमॅटमध्ये टॉप 5 फलंदाजांमध्ये विराजमान झाला आहे.

एमपीसी न्यूज – आयसीसीने कसोटी क्रमवारीची ताजी यादी जाहीर केली. या यादीत भारतीय कर्णधार विराट कोहली हा दुस-या स्थानावर आहे तर पाकिस्तानच्या बाबर आझमला टॉप फाईव्ह मध्ये स्थान मिळाले आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला एका स्थानाने खाली ढकलत पाचवे स्थान पटकावले आहे.

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील साऊथॅम्प्टनचा दुसरा कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. सामन्यात चार दिवस सलग पाऊस पडला. पहिल्या डावात पाकिस्तानने 236 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने सामना अनिर्णित होण्यापूर्वी चार गडी गमावून 110 धावा केल्या. त्यामुळे सामन्याचा निकाल लागू शकला नाही.

त्यानंतर आयसीसीने कसोटी क्रमवारीची ताजी यादी जाहीर केली. या यादीत भारतीय कर्णधार विराट कोहली हा दुस-या स्थानावर आहे. तर पाकिस्तानचा बाबर आझम पाचव्या स्थानावर आला आहे. याचसोबत बाबर आझम तिन्ही फॉरमॅटमध्ये टॉप 5 फलंदाजांमध्ये विराजमान झाला आहे. T20 मध्ये तो अव्वलस्थानी, तर वन डेमध्ये तिसऱ्या स्थानी आहे.

गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा जसप्रीत बुमराह आणि न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट यांची एक-एक स्थानाने घसरण झाली आहे. बुमराह नवव्या तर बोल्ट दहाव्या स्थानी गेला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.