Anil Deshmukh : अखेर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची उदया होणार सुटका

एमपीसी न्यूज : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. काही महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर आता (Anil Deshmukh) हायकोर्टाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्या जामीनाच्या स्थगितीला मुदत वाढवून देण्याच्या सीबीआयच्या मागणीला हायकोर्टाने फेटाळली असून त्यांची उद्याच सुटका होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयानं देशमुख यांच्या जामीनाला आजपर्यंत वाढीव स्थगिती दिली होती. आज सीबीआयने हायकोर्टात त्यांची स्थगिती वाढवण्यासाठी याचिका दाखल केली होती. परंतु, त्यांची स्थगिती हायकोर्टानेफेटाळली असून उद्या अनिल देशमुख यांची सुटका होणार आहे.

Smart City: केबल नेटवर्क प्रकरण शिंदे-फडणवीस यांच्याच काळातले – नाना काटे

अनिल देशमुख यांना काही अटींवर जामीन देण्यात (Anil Deshmukh) आला आहे. त्यांना 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्याता आला आहे. त्यानुसार, अनिल देशमुखांना त्यांचा पासपोर्ट तपास यंत्रणांकडे जमा राहणार आहे. तपास यंत्रणा आणि कोर्टाच्या परवानगीशिवाय त्यांना देशाबाहेर जाता येणार नाही. तसेच, आठवड्यातून दोन दिवस त्यांना ईडी कार्यालयात हजेरी लावावी लागणार. याशिवाय तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना तपासात संपूर्णपणे सहकार्य करण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.