Mhalunge News : क्रेनच्या धडकेत आईस्क्रीम विक्रेत्या सायकलस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – आईस्क्रीम विक्रीसाठी निघालेल्या तरुणाच्या सायकलला क्रेन चालकाने पाठीमागून धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला.(Mhalunge News) हा अपघात गुरुवारी (दि. 9) दुपारी बारा वाजता वाघजाईनगर येथे घडला.महेंद्र मुरली (वय 31) असे मृत्यू झालेल्या सायकलस्वाराचे नाव आहे. 

याप्रकरणी विजयकुमार शिवरतन (वय 22, रा. खराबवाडी) यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय उत्तम मोहिते (रा. शेलपिंपळगाव, ता.खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri Crime : लॉजमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मित्र महेंद्र हा सायकलवरून आईस्क्रीम विकण्याचा व्यवसाय करतो. गुरुवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास तो वाघजाई नगर येथील अहमदनगर फोर्जिंग कंपनीसमोरून सायकलवरून जात होता.

त्यावेळी अक्षय हा एमएच 14/ एचक्यू 0915 हे क्रेन घेऊन जात होता. त्याने क्रेन भरधाव वेगाने चालवून महेंद्रच्या सायकलला पाठीमागून धडक दिली. (Mhalunge News) त्यामध्ये महेंद्रच्या डोक्याला, पोटाला, हाताला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.