ICSE Board Result: ICSE बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षांचा उद्या ऑनलाईन निकाल

ICSE Board result: Online results of ICSE board 10th-12th exams tomorrow CBSE च्या निकालाची तारीख अद्याप जाहीर नाही

एमपीसी न्यूज : द कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (ICSE) बोर्डाने दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल उद्या (शुक्रवारी) दुपारी तीन वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर घोषित करण्यात येईल, असे जाहीर केले आहे.

आयसीएसईच्या result.cisce.org या बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर उद्या दुपारी 3 वाजता निकाल जाहीर होईल, असे बोर्डाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

त्यासाठी https://results.cisce.org/ किंवा www.cisce.org या वेबसाईटला भेट द्या. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर https://www.cisce.org/ जा तिथे Career पोर्टलला क्लिक करा आणि यावर्षीच्या तुमच्या परीक्षेची कॅटेगरी निवडा त्यानंतर रोल नंबर आणि इतर माहिती भरा. Print Result किंवा डाऊनलोड रिझल्ट असा पर्याय येईल त्या ठिकाणी थेट तुमचा निकाल पाहता येऊ शकेल.

CBSE च्या निकालाची तारीख अद्याप जाहीर नाही

सीबीएसई बोर्डाच्या (CBSE) इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या निकालाची तारीख जाहीर झाल्याच्या बातम्या काही वेबसाईटवर प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र, अद्याप निकालाची तारीख जाहीर झाली नसल्याचे सीबीएसई बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी न पडण्याचे आवाहन बोर्डाने केलं आहे.

काही वेबसाईट वर 18 जुलै 12 वीच्या वर्गाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तर 10 वी इयत्तेचा निकाल 15 ते 17 जुलैदरम्यान जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रसिद्ध करण्यात आले होते.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण परिषदने (CBSE) अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करत अद्याप बोर्डाकडून निकालाची कोणतीही तारीख जाहीर केली नसल्याचं सांगितलं आहे. सीबीएसईद्वारा निकालाची माहिती अधिकृत संकेतस्थळ cbseresults.nic.in यावर जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी या वेबसाईटवर खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.