Pune News : पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतरही शहरातील अवैध धंदे सुरूच, शाळेलगतच्या जुगाराच्या अड्ड्यावर छापा

एमपीसी न्यूज : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वारंवार सांगूनही शहरातील अवैध धंदे काही बंद होण्याची चिन्हे दिसत नाहीत. समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका शाळेच्या भिंती जवळच जुगाराचा मोठा अड्डा सुरू होता. गुन्हे शाखेच्या पथकाने या अड्ड्यावर छापा मारून 13 जणांना ताब्यात घेतले. पोलीस स्टेशन पासून काही अंतरावर आणि शाळेच्या भिंती लगतच सुरू असणाऱ्या या जुगार अड्डाकडे स्थानिक पोलिसांचे लक्ष नव्हते का असा प्रश्नही आता सामान्य नागरिकांतून विचारला जात आहे.

 गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यावेळी रायटर सुभाष महादेव धनवटे (वय ६३), सादिक पापामिया तांबोळी (वय ६२), सोमेश्वर प्रभाकर गायकवाड (वय ५४), विजय शंकर बडदे (वय ४०), राजेंद्र धोंडिबा बनसोडे (वय ५५) यांच्यासह खेळणाऱ्या गजानन सुग्रीव लोमटे (वय ३०), विक्रम अशोक बनकर (वय ३१), सलिम महंमद उस्मान मनसुरी (वय ४०), रमेश व्यंकट कुंडकर (वय ५७), विलास गोपाल तापकीर (वय ६३), अजित जनार्धन जाधव (वय ४५), संजय कांतीलाल बोरा (वय ५२), रतिकांत लक्ष्मण सोनवणे (वय ५०) यांना पकडण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरातील अवैध धंदे बंद करण्याच्या सूचना यापूर्वी अनेकदा दिल्या होत्या. यापूर्वी ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत अशा प्रकारे अवैध धंदे सुरू असल्याचे निदर्शनास आले आले होते.  त्यावेळी संबंधित पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही शहरातील अनेक पोलिस स्टेशनच्या हद्दीत अवैध प्रकार सुरू असल्याचे दिसत आहे.

दरम्यान समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत, पोलीस स्टेशन पासून काही अंतरावर आणि एका शाळेच्य सीमाभिंती लगतच कल्याण नावाचा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक विभागाला समजली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. त्यावेळी येथे ८४ हजार ३८० रोकड मोबाईल असाए एकूण सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जुगार अड्डा आप्पा कुंभार याचा असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले असून, तो फरार आहे. त्याचा शोध घेतला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.