Chakan News : इंद्रायणी नदीपात्रात अवैध वाळू उपसा ; पोकलेन, जेसीबी व तीन ट्रॅक्टर जप्त

एमपीसी न्यूज – इंद्रायणी नदीपात्रात अवैध वाळू उपसा प्रकरणी तलाठी व पथकाने छापा टाकून कारवाई केली. यामध्ये एक पोकलेन, एक जेसीबी व तीन ट्रॅक्टर असा 94 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मौजे खालुंब्रे व येलवाडी, ता. खेड या ठिकाणी मंगळवारी (दि.12) रात्री दीडच्या सुमारास ही कारवाई केली. आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. 

तलाठी विष्णु आण्णा रुपनवर यांनी याबाबत चाकण (म्हाळुंगे चौकी) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोकलेन, जेसीबी व ट्रॅक्टर चालक, मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इंद्रायणी नदीपात्रात अवैध पद्धतीने वाळू उपसा करीत होते. तलाठी व त्यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला. अंधाराचा फायदा घेऊन आरोपी या ठिकाणावरून फरार झाले. पथकाने एक पोकलेन, एक जेसीबी व तीन ट्रॅक्टर असा 94 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.