Sanjay Rathod : पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांकडून संजय राठोड यांना पूर्णपणे ‘क्लीन चिट’?

एमपीसी न्यूज : शिवसेनेचे माजी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी पूर्णपणे क्लीनचिट दिल्याचे समोर आले आहे. याबाबत त्यांनी माध्यमांना माहिती देताना म्हंटले आहे, की पूजा चव्हाण प्रकरणी बंजारा समाजाचे महंत आणि ऑल इंडिया बंजारा सेवा संघाने पुणे पोलिसांना भेट दिली असता, ही माहिती समोर आली आहे. त्यांना याबाबत अधिकृत माहिती अजून तरी मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले. 

7 फेब्रुवारी 2021 रोजी बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या समाजमाध्यमांवरील प्रसिद्ध युवतीने वानवडीमधील हेवन पार्क इमारतीमधल्या सदनिकेतून उडी मारून आत्महत्या केली. या आत्महत्येचा संबंध थेट तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यासोबत जोडण्यात आला. त्यावेळी बंजारा समाजाच्या भूमिकेने त्यांच्यावर दबाव निर्माण झाला. आणि संजय राठोड यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

Pune Crime Branch : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी पुणे गुन्हे शाखेने भंगार विक्रेत्याकडून केले 1105 काडतुसे जप्त

या प्रकरणी सोशल मीडियावर दोन ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाल्या होत्या. ज्यामुळे संजय राठोड यांच्यावर थेट आरोप केले जात होते. ज्यात पूजा चव्हाण आणि संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे मैत्री बाहेरील संबंध जोडण्यात येत होते. संजय राठोड यांच्याकडून आलेल्या काही भेट वस्तूंचे फोटो देखील व्हायरल झाले होते. परंतु, आज नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार पुणे पोलिसांनी संजय राठोड यांना क्लीनचिट देण्यात आल्याने हे वरील सर्व गोष्टी निराधार ठरणार आहेत.

या विषयी सांगताना, संजय राठोड म्हणाले, की ”दोन पक्षांच्या तणावात माझे नुकसान झाले. सत्य समोर येण्यासाठीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.” पूजा चव्हाण हीच्या पालकांनी आम्हाला कोणतीही तक्रार देयाची नसल्याचे स्पष्ट केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.