Karla : कार्ला येथे पीक विमा मदत केंद्राचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मावळ तालुक्यातील कार्ला परिसरातील शेतक-यांना पीक विम्याबाबत माहिती व्हावी, पीक विमा मिळण्यासाठी येणा-या अडचणींबाबत त्यांना मदत व्हावी, यासाठी कार्ला फाटा येथे शिवसेनेच्या पुढाकाराने पीक विमा मदत केंद्राचे उद्घाटन जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपसभापती शरद हुलावळे, विभाग संघटक एकनाथ जांभुळकर, युवासेना चिटणीस विशाल हुलावळे, भाविसे उपजिल्हा संघटक रज्जाक मणियार, विभागप्रमुख काळु हुलावळे, उपविभाग प्रमुख संतोष बोंबले, भाविसेचे उपसंघटक संतोष येवले, उपसरपंच अविनाश हुलावळे, उपसरपंच प्रदीप हुलावळे,सागर हुलावळे, शाखाप्रमुख सचिन हुलावळे, मा.शाखाप्रमुख विनोद हुलावळे, सनी हुलावळे, विशाल गरूड, संतोष कोंडभर, महेश हुलावळे, विष्णू हुलावळे, श्रीकांत तिकोणे, प्रशांत शेडगे, अविनाश हुलावळे, मंगेश सावंत, शेखर मोरे आदी शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन उपसभापती शरद हुलावळे यांनी केले. तर सूञसंचालन भाऊसाहेब हुलावळे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.