Talegaon : हिंद विजय पतसंस्थेच्या सोमटणे शाखेचे उद्या उद्घाटन

एमपीसी न्यूज – हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्थेच्या सोमटणे फाटा येथील शाखेचे उद्घाटन राज्यमंत्री संजय भेगडे यांच्या हस्ते गुरुवारी १२सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता रामचंद्र मंगल कार्यालय येथे होत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भाजपचे ज्येष्ठ नेते पिराजीमामा काकडे हे भूषविणार आहेत अशी माहिती, पतसंस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ दाभाडे, सचिव कैलास भेगडे यांनी दिली. हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्था तालुक्यातील एक अग्रगण्य पतसंस्था असून संस्थापक माजी नगराध्यक्ष एड. रवींद्रनाथ दाभाडे आहेत.

प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार दिगंबर भेगडे, माजी आमदार प्रकाश देवळे, सहकारी संस्था सहाय्यक निबंधक विठ्ठलराव सूर्यवंशी, पंचायत समितीचे सभापती सुवर्णा कुंभार, उपसभापती जिजाबाई पोटफोडे, सरपंच गोकुळ गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संस्थेचे कार्यक्षेत्र पुणे जिल्हा असून संस्थेस आयएसओ ९००१ – २००८ मानांकन  प्राप्त आहे. संस्थेस ऑडिट वर्ग ‘अ’आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांची सोय व्हावी, त्यांची आर्थिक पत वाढावी या उद्देशाने पतसंस्थेच्या शाखेचा विस्तार करण्यात येत असल्याचे पतसंस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like