Alfa Laval : अल्फा लावल येथे भारतीय ग्राहक केंद्राचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – अल्फा लावलच्या भारतातील 85 व्या स्थापना वर्षानिमित्त कंपनीच्या विक्री व सेवा कार्यालय अर्थात भारतीय ग्राहक केंद्राचे आज (बुधवारी) उद्घाटन करण्यात आले.(Alfa Laval) कंपनीची तीन उत्पादन केंद्रे दापोडी येथील कंपनीच्या परिसरात उभारली असून ही सुमारे एक लाख चौरस फुटाची आहेत. जेथे सुमारे साडेपाचशे लोक या केंद्रामध्ये एकाच वेळी बसु शकतात.

यावेळी कंपनीचे शेकडो कर्मचारी आणि अल्फा लावल समुहाचे कार्यकारी उपाध्यक्ष व उर्जा विभागाचे अध्यक्ष थॉमस मोलर तसेच अल्फा लावलचे भारत, पश्चिम आशिया व दक्षिण पूर्व आफ्रिकेचे क्लस्टर अध्यक्ष सर्गिओ हिके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

कंपनीच्या शाश्वत विकासाच्या मुल्यांनुसार या केंद्राची रचना करण्यात आली आहे.कंपनीचे कर्मचारी, ग्राहक आणि अभ्यागत यांना ग्राहकसेवेचा एक अभिनव अनुभव या ठिकाणी मिळू शकतो.(Alfa Laval) हे केंद्र कंपनीच्या भारतातील विक्री व सेवा सुविधेसाठीचे केंद्र तर असेलच शिवाय सुमारे शंभरहून अधिक देशांमध्ये कार्यरत असलेल्या अल्फा लावल कंपनीच्या जगभरातील अभियांत्रिकी आण पुरवठा प्रकल्पासाठीही ते एक मध्यवर्ती केंद्र म्हणून कार्य करेल.

MP Shrirang Barne : रेल्वे अंडरपास, ओव्हर ब्रीजच्या कामाला गती द्या; पुणे-लोणावळा दरम्यान दुपारीही लोकल सुरु करा

यावेळी बोलताना कंपनीच्या भारत, पश्चिम आशिया तसेच दक्षिण व पूर्व आफ्रिका क्लस्टरचे उपाध्यक्ष सर्गिओ हिके म्हणाले की, हे भारतीय ग्राहक केंद्र म्हणजे कंपनीच्या भारतातील (Alfa Laval) विकासकेंद्री दृष्टीचे एक प्रतिक आहे. कंपनीच्या भारतातील कामाला 85 वर्षांचा प्रेरणादायी इतिहास आहे, असेही त्यांनी सांगितले.

या वेळी बोलताना अल्फा लावल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सुभासिस दास म्हणाले की, हे नवे केंद्र आमचे ग्राहक आणि त्यांना सेवा पुरविणारे आमचे कर्मचारी यांना समर्पित आहे. (Alfa Laval)आमचेग्राहक, आमचे नागरिक आणि या पृथ्वीच्या भरभराटीसाठी प्रयत्न करणे हे आमचे उद्दिष्ट्य राहिले आहे आणि हे नवे केंद्र त्यादृष्टिने उचललेले आणखी एक पाऊल आहे, असे मत व्यक्त केले.

अल्फा लावलमध्ये 16 हजार 700 कर्मचारी काम करतात. कंपनीने 2020 साली 41.5 अब्ज स्वीडिश क्रोनार (म्हणजे सुमारे 4 अब्ज युरो) इतका व्यवसाय केला.(Alfa Laval) भारतातील खाद्यप्रक्रिया, तेल व नैसर्गिक, वायू, उर्जानिर्मिती, पोलाद व धातु, साखर, औषधनिर्मिती, कागद व लगदा निर्मिती, खाद्यतेल, प्रक्रिया, डिस्टीलरी, ब्रुवरी, स्टार्च, इनऑर्गेनिक, मरिन आणि इफ्लुअंट हँडलिंग आदी विविध उद्योगांमध्ये कंपनीची उत्पादने व प्रक्रिया यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.