Ind vs Aus Test Series : दिवसअखेरीस भारत 1 बाद 36 ; ऑस्ट्रेलिया सर्वबाद 195

एमपीसी न्यूज – दुस-या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगारी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला सर्व गड्यांच्या बदल्यात 195 धावांवर समाधान मानावे लागले. त्याबदल्यात भारताने दिवसाअखेरीस 1 बाद 36 धावापर्यंत मजल मारली.

दिवसअखेर शुबमन गिल नाबाद 28, तर चेतेश्वर पुजारा नाबाद 7 धावांवर खेळत होता. ऑस्ट्रेलियाकडे पहिल्या डावात अजुनही 159 धावांची आघाडी आहे.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन आश्विन यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडलं. मार्नस लाबुशेन आणि ट्रॅविस हेड यांचा अपवाद वगळता एकही ऑस्ट्रेलियन फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही.

लाबुशेनने 48, तर हेडने 38 धावा केल्या. जसप्रीत बुमराहने 4, आश्विनने 3, तर पदार्पणाचा कसोटी सामना खेळणाऱ्या मोहम्मद सिराजनेही 2 बळी घेतले.

भारतीय संघाची सुरुवातही खराब झाली. सलामीवीर मयांक अग्रवाल पहिल्याच षटकात स्टार्कच्या गोलंदाजीवर एकही धाव न काढता माघारी परतला. सुरवातीलाच दडपण आलेल्या भारतीय संघाच्या शुबमन गिलने काही सुरेख फटके खेळत दडपण कमी केलं.

गिलने 5 चौकाराच्या मदतीने 38 चेंडूत 28 धावांची खेळी केली. पुजारानेही त्याला उत्तम साथ दिली, तो नाबाद 7 धावांवर खेळत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.