Indapur : प्रसिद्ध गायक आनंद शिंदे अपघातातून थोडक्यात बचावले

एमपीसी न्यूज- सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला पुणे सोलापूर रस्त्यावर इंदापूरजवळ अपघात झाला. या अपघातातुन आनंद शिंदे थोडक्यात बचावले. इंदापूरमधील खासगी दवाखान्यात उपचार घेऊन शिंदे सांगोल्याकडे रवाना झाले. हा अपघात आज, मंगळवारी पहाटे 3 वाजता घडला.

पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळील वरकुटे येथे शिंदे यांच्या तवेरा गाडीने (एम एच 46 झेड 2444) डंपरला धडक दिली. गाडीमध्ये त्यावेळी तिघेजण प्रवास करीत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.