India Corona Update : चोवीस तासांत 26,567 नवे रुग्ण, बाधितांची संख्या 97 लाखांवर

एमपीसी न्यूज – मागील 24 तासांत देशभरात कोरोनाची दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. देशात 26 हजार 567 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे तर, 385 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 97 लाख 03 हजार 770 एवढी झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, देशात मागील 24 तासांत 39 हजार 045 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 91 लाख 78 हजार 946 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या देशात 3 लाख 83 हजार 866 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मागील 24 तासांत देशभरात 385 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आजवर 1 लाख 40 हजार 958 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.59 टक्के एवढं आहे तर, मृत्यूदर 1.45 टक्के एवढा आहे.

आयसीएआरच्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत 14 कोटी 88 लाख 14 हजार 055 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 10 लाख 26 हजार 399 नमूने सोमवारी (दि.8) तपासण्यात आले आहेत.

मागील काही दिवसांपासून देशात 30 ते 40 हजारांच्या घरात नव्या रुग्णांची वाढ होत असताना. गेल्या 24 तासांत झालेली 26 हजार 567 नव्या रुग्णांची वाढ काहीशी दिलासादायक आहे. दुसरीकडे रिकव्हरी रेट निरंतर वाढत असल्यानं संसर्गाचा वेग मंदावत असल्याचे दिसून येत आहे. देशातील 27 राज्य व केंद्र शासित प्रदेशात 15 हजार पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.