Pune Crime News : दौंड तालुक्यातून दहा लाखाचा गांजा जप्त, चार आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – पुणे ग्रामीण पोलिसांनी दौंड तालुक्यातील बोरीयेंदी गावातून दहा लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला असून चार आरोपींना अटक केली आहे. आरोपी मध्ये एका महिलेचाही समावेश आहे. एका चारचाकी गाडीतून आरोपी गांजाची वाहतूक करत होते.

प्रकाश राजेंद्र जाधव (वय वर्षे 20, रा. खराबवाडी ता. खेड जि. पुणे) तानाजी दिगंबर जाधव (वय वर्षे 21 रा. इठा ता. भुम जि. उस्मानाबाद सध्या रा. रूपीनगर, पाण्याचे टाकीजवळ, निगडी) सुरेश उर्फ अर्जुन दिगंबर पवार (वय वर्षे 52 रा. बोरीऐंदी ता. दौंड जि. पुणे) आणि द्रौपदा सुरेश उर्फ अर्जुन पवार (वय वर्षे 47 रा. बोरीऐंदी ता. दौंड जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यवत पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरीऐंदी भरतगाव रोडने पेट्रोलींग करीत असताना त्यांना संशयास्पद अवस्थेत एक कार दिसली. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून या कारला ताब्यात घेतले. पोलिसांनी या कारची झडती घेतली असता कारच्या डिकीत दोन पोत्यात 41 किलो गांजा ठेवला होता.

पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरोधात एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम 8(ब), 20(ब) 2(क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.