India Corona Update : गेल्या 24 तासांत 93,356 जण कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 80 टक्क्यांवर

एमपीसी न्यूज – देशातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 44 लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 93 हजार 356 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 80 टक्क्यांवर पोहोचले आहे. तसेच, 24 तासांत 86 हजार 961 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 54 लाख 87 हजार 581 एवढी झाली आहे. त्यापैकी 43 लाख 96 हजार 399 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर, 10 लाख 03 हजार 299 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत 1,130 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 87 हजार 882 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत.


देशात आजवर तब्बल 6 कोटी 43 लाख 92 हजार 594 नमूने तपासण्यात आले आहेत त्यापैकी 7 लाख 31 हजार 534 नमूने मागील 24 तासांत तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.


देशातील 60 टक्के कोरोना रुग्ण हे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश व दिल्लीमध्ये आहेत. देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 80 टक्क्यांवर पोहोचले आहे तर, 1.6 टक्के मृत्यूदर आहे. देशात सध्या 18.3 टक्के सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सिरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी आजपासून पुण्यातील ससून रुग्णालयात सुरू होत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.