India Corona Update : पॉझिटिव्हीटी रेट 9.28 टक्क्यांवर, 24 तासांत 1,41,986 नवे कोरोना रुग्ण

एमपीसी न्यूज – देशात कोरोना संसर्ग पुन्हा हातपाय पसरायला लागला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 1 लाख 41 हजार 986 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट वाढून 9.28 टक्क्यांवर पोहोचला आहे. ओमायक्रॉन बाधित रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होत असून, ती 3 हजार 071 एवढी झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 53 लाख 68 हजार 372 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 44 लाख 12 हजार 740 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 40 हजार 895 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाचा रिकव्हरी रेट 97.29 टक्के एवढा झाला आहे.

देशातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. सध्या देशात 4 लाख 72 हजार 169 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 285 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 4 लाख 83 हजार 463 कोरोना रुग्ण दगावले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.36 टक्के एवढा झाला आहे. आयसीएमआरच्या आकडेवारी नुसार देशात आजवर 68.84 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.