India News : देशात एप्रिल महिन्यात आजवरचे सर्वाधिक जीएसटी संकलन; महाराष्ट्र राज्य देशात अग्रेसर

एमपीसी न्यूज – एप्रिल 2023 मध्ये 1 लाख 87 हजार 35 कोटी रुपयांचे एकत्रित जीएसटी महसूल (India News) संकलन झाले आहे. यामध्ये सीजीएसटी (CGST) 38 हजार 440 कोटी रुपये, एसजीएसटी (SGST) 47 हजार 412 कोटी रुपये, आयजीएसटी (IGST) 89 हजार 158 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीमधून गोळा केलेल्या 34 हजार 972 कोटी रुपयांसह) आणि अधिभार 12 हजार 25 कोटी रुपये वस्तूंच्या आयातीमधून गोळा केलेल्या 901 कोटी रुपयांसह) यांचा समावेश आहे. एप्रिल 2023 मध्ये महाराष्ट्रात एकूण 33 हजार 196 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन करण्यात आले आहे. हे संकलन देशात सर्वाधिक आहे.

सरकारने आयजीएसटी मधून नियमित थकबाकीपोटी 45 हजार 864 कोटी रुपयांच्या सीजीएसटीची आणि  37 हजार 959 कोटी रुपयांच्या एसजीएसटीची थकबाकी चुकती केली आहे. नियमित थकबाकी चुकती केल्यानंतर एप्रिल 2023 या महिन्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून सीजीएसटीसाठी 84 हजार 304 कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी 85 हजार 371 कोटी रुपये इतका महसूल जमा झाला आहे.

Manobodh by Priya Shende Part 95-मनोबोध भाग 95 – अजामेळ पापी वदे पुत्रकामे

एप्रिल 2023 महिन्यात जीएसटीपोटी गोळा झालेला महसूल,  मागील वर्षी याच महिन्यात संकलित जीएसटी महसुलापेक्षा 12 टक्क्यांनी अधिक आहे. या वर्षी एप्रिल महिन्यात (सेवांच्या आयातीसह) देशांतर्गत व्यवहारांद्वारे जमा झालेला महसूल गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 16 टक्क्यांनी जास्त आहे.

देशातील एकूण जीएसटी संकलनाने या महिन्यात प्रथमच 1.75 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मार्च 2023 मध्ये जारी करण्यात आलेल्या एकूण ई-वे बिलांची संख्या 9 कोटी होती. ही आकडेवारी, फेब्रुवारी 2023 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या 8.1 कोटी ई-वे बिलांपेक्षा 11 टक्क्यांनी अधिक आहे.

एप्रिल 2023 मध्ये 20 तारखेला दैनंदिन पातळीवरील आतापर्यंतचे सर्वाधिक कर संकलन झाले. या दिवशी 9.8 लाख व्यवहारांच्या माध्यमातून, 68 हजार 228 कोटी रुपये कर संकलित करण्यात आला. गेल्या वर्षी याच तारखेला एका दिवसातील सर्वात जास्त कर संकलन झाले होते (India News)आणि तेव्हा 9.6 लाख व्यवहारांच्या माध्यमातून 57 हजार 846 कोटी रुपये संकलित करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.