Corona Update : भारताकडून आणखी 49 देशांना कोरोना लस

0

एमपीसी न्यूज : कोरोना विषाणूविरूद्धच्या (Coronavirus)लढाईत गरीब देशांना कोट्यवधींच्या लस दिल्याबद्दल (Vaccine Supply) जगभरात भारताचं कौतुक होत आहे. आता अनेक श्रीमंत देशही आपल्या नागरिकांसाठी लसीची मागणी करत आहेत. कोरोनाची लस शेजारच्या देशांना पुरविल्यानंतर भारत आता कॅरिबियन देशांनाही लस देत आहे.

ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोनासोबतच्या लढाईमध्ये कॅरेबियन देश मागे राहिले होते, परंतु भारताकडून लस पुरवठा झाल्यानं त्यांना आधार मिळाला आहे. भारत सरकारने अलीकडेच नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार, सेशेल्स आणि मालदीव या शेजारील देशांना लस पुरवल्या किंवा विकल्या आहेत. चिनी लसीच्या तुलनेत भारतात तयार झालेली लस इतर देशांना पर्याय उपलब्ध करते. सध्या बीजिंग जगभर आपली लस विकायचा प्रयत्न करीत आहे.

_MPC_DIR_MPU_II

परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, लॅटिन अमेरिका, कॅरिबियन देश, आशिया आणि आफ्रिका खंड या देशांसह एकूण 49 देशांना ही लस पुरवण्याची भारताची योजना आहे, ही लस विनामूल्य उपलब्ध करुन दिली जाईल. भारताने आता “लस फ्रेंडशिप” अंतर्गत 22.9 दशलक्ष लसांचे वाटप केले असून त्यापैकी 64.7 लाख लस अनुदान म्हणून देण्यात आल्या आहेत.

गुरुवारी, डोमिनियन रिपब्लिकचे अंतर्गत व्यवहार मंत्री, रॅचेल पेना म्हणाले की, भारताने कोरोना विषाणूच्या लसीचे 30,000 डोस त्यांच्या देशाला भेट म्हणून दिले आहे. याशिवाय डोमिनिकालाही भारताने 70 हजार लसी उपलब्ध करुन दिल्या आहेत. डोमिनिकाच्या संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण करण्यासाठी या लसी पुरेशा असतील. या महिन्याच्या सुरूवातीला भारताने बार्बाडोसला 10 हजार लस दिल्या. यासह, संयुक्त राष्ट्रांच्या शांतता अभियानासाठी भेट म्हणून 2 लाख लस देण्याचे आश्वासन भारताने दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.