Pimpri : इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्यतर्फे ‘खेलोत्सव’

एमपीसी न्यूज – इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा ‘खेलोत्सव 2020’ चे आयोजन करण्यात आले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन पिंपरी-चिंचवड भोसरी शाखेकडे या स्पर्धांचे यजमानपद आहे. शनिवार (दि. 15 फेब्रुवारी), रविवार (दि. 16 फेब्रुवारी) रोजी या स्पर्धा बी के बिर्ला सेंटर फॉर एज्युकेशन, शिरगाव येथे होणार आहेत.

याबाबतची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन पिंपरी-चिंचवड भोसरी शाखेचे डॉ. सुहास माटे, डॉ. सुधीर भालेराव यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. संजय देवधर, डॉ. विजय सातव, डॉ. प्रकाश रोकडे, डॉ. मिलींद सोनावणे, डॉ. सुशील मुथियान, डॉ. मंदार डोईफोडे, डॉ. रितु लोखंडे, डॉ. सचिन कोल्हे आदी उपस्थित होते.

खेलोत्सव 2020 स्पर्धेत राज्यभरातील डॉक्टर सहभागी होणार आहेत. जळगाव, धुळे, नांदेड, अमरावती, यवतमाळ, नागपूर, बारामती, पुणे आदी शहरातून सुमारे 400 स्पर्धक सहभाग घेणार आहेत. खेलोत्सवमध्ये कॅरम, बुद्धिबळ, क्रिकेट, लॉन टेनिस, बॅडमिंटन, टेबल टेनिस, स्वामिंग, मॅरेथॉन या स्पर्धा होणार आहेत.

असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, डॉ. दिलीप कामत, डॉ. संजय देवधर, डॉ. सुहास माटे, संजीव दात्ये, डॉ. विजय सातव, डॉ. सुधीर भालेराव, डॉ. सुशील मुथीयान, डॉ. ललित धोका, डॉ. मंदार डोईफोडे आदी स्पर्धेचे समन्वयन कारणात आहेत. स्पर्धेच्या उदघाटन समारंभात इंडियन मेडिकल असोसिएशन पिंपरी-चिंचवड भोसरी शाखेचे ‘स्पंदन’ या मासिकाचे प्रकाशन होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.