_MPC_DIR_MPU_III

IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्जस् संघात दोन दमदार खेळाडूंची एन्ट्री

चेन्नई सुपर किंग्जस् संघातील दोन खेळाडूंना आणि 12 सहाय्यक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली.

एमपीसी न्यूज – चेन्नई सुपर किंग्जस् संघातील दोन खेळाडूंना आणि 12 सहाय्यक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर सुरेश रैनाने वैयक्तिक कारण देत संपूर्ण आयपीएल मधूनच माघार घेतली. दरम्यान, अशा वाईट बातम्यांची मालिका सुरू असतानाच चेन्नईसाठी एक दिलासा माहिती समोर आली आहे. सीएसकेच्या संघात दोन दमदार क्रिकेटपटूंची एन्ट्री झाली आहे.

_MPC_DIR_MPU_IV

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी दक्षिण आफ्रिकेचे तीन दमदार खेळाडू मंगळवारी युएईमध्ये दाखल झाले. फाफ डू प्लेसिस, लुंग एन्गीडी आणि कॅगिसो रबाडा हे तिघे आफ्रिकेतून मंगळवारी सकाळी युएईमध्ये आले.

या तिघांपैकी फाफ डू प्लेसिस आणि लुंगी एन्गीडी दोघे चेन्नईच्या संघात दाखल होणार आहेत, तर रबाडा दिल्ली कॅपिटल्सच्या संघात सामील होणार आहे.

दोन्ही संघांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून या खेळाडूंचे फोटो ट्विट केले आहेत.

रैनाच्या अनुपस्थितीत डु प्लेसिस हा चेन्नईसाठी आधार ठरू शकतो. आयपीएलमध्ये त्याने 71 सामन्यात 1853 धावा केलेल्या आहेत.

_MPC_DIR_MPU_II

महत्त्वाचे म्हणजे गेल्या हंगामात त्याने 12 सामने खेळत 396 धावा केल्या होत्या. त्यात 96 धावांची त्याची सर्वश्रेष्ठ वैयक्तिक खेळीदेखील समाविष्ट होती.

आयपीएल 2019 मध्ये त्याने तीन अर्धशतके ठोकली होती.

लुंगी एन्गीडी हा देखील चेन्नईसाठी भरवशाचा गोलंदाज आहे. दीपक चहर सध्या करोनाग्रस्त आहे. तो झटपट पूर्णपणे तंदुरूस्त न झाल्यास सुरूवातीच्या सामन्यांमध्ये एन्गीडीचा सलामी गोलंदाजीचा भार एकटा पेलवू शकतो.

एन्गीडीने 2018च्या आयपीएलमध्ये सात सामन्यात 11 बळी घेतले होते.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.