Pimpri : रेल्वेच्या धडकेत इसमाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – धावत्या रेल्वेच्या धडकेत एका इसमाचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि. 5) रात्री आठ वाजता कासारवाडी रेल्वे स्थाकाजवळ झाला.

मयत व्यक्तीचे वय अंदाजे 40 वर्ष आहे. उंची पाच फूट पाच इंच असून चेहरा उभट, नाक सरळ, अंगाने मध्यम, रंग निमगोरा, केस काळे असून दाढी वाढलेली आहे.

अंगात राखाडी रंगाचे हाफ बनियन व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातलेली आहे. रेल्वे रूळ ओलांडताना अज्ञात रेल्वेच्या धडकेत हा अपघात झाला असून याबाबत माहिती मिळाल्यास पिंपरी रेल्वे पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.