ITI: ऍप्टीट्युड टेस्टमध्ये 160 विद्यार्थ्यांचा सहभाग

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण विभागाच्या (ITI) अंतर्गत घेण्यात आलेल्या ऍप्टीट्युड टेस्टमध्ये 160 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी ग्लोबल व्होकेशनल स्किल्स स्टडी व रोजगार संधी उपलब्ध करुन देणेकामी मे. ग्राडड्रिम ( अर्थसेतू) यांच्या मार्फत परदेशातील शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे.

याकामी 16 मार्च 2023 रोजी विद्यार्थी व पालक यांच्यासाठी पहिल्या फेजमध्ये एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

त्यास उत्स्फूर्त मिळाला त्याचाच पुढील भाग म्हणून 31 मार्च 2023 रोजी दुस-या फेजसाठी रेजिस्ट्रेशन झालेल्या साधारण 340 विद्यार्थ्यांची ऍप्टीट्युड टेस्ट मोरवाडी आय.टी.आय येथे आयोजित करण्यात आली होती.

या टेस्टसाठी (ITI) जनरल नॉलेज, इंग्रजी ग्रामर, इंग्रजी ग्रामर डायग्नोस्टीक व इंग्रजी निबंध असे विषय अर्थसेतू कडून निवडण्यात आले होते. या टेस्टसाठी आय.टी.आय तील व बाहेरील असे साधारण 160 विद्यार्थी समक्ष हजर राहिले. ऑनलाईन पद्धतीने ( निबंध विषय वगळून ) त्यांची मोबाईलवर परिक्षा घेण्यात आली.

Pune : पुण्यात कलारंग महोत्सवाचे आयोजन

उत्साही वातावरणात व आनंदाने सर्वांनी यामध्ये सहभाग घेतला होता. मे. ग्राड ड्रिम ( अर्थसेतू ) चे सीईओ सुनित सुरवसे यांनी सांगितले की, ज्या विद्यार्थ्यांना टेस्टसाठी हजर राहण्यास शक्य झाले नाही, त्यांच्यासाठी लवकरच ऑनलाईन टेस्टचे नियोजन करण्यात येईल. यावेळी प्राचार्य, गटनिदेशक, निदेशक, कर्मचारी व परदेशी शिक्षणासाठी इच्छुक असलेले विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.