Lonavala accident : लोणावळ्यात एसटी बस व दुचाकीचा अपघात; तीन महिला जखमी

एमपीसी न्यूज : मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर नारायणी धाम पोलीस चौकी समोरील वलवण फाट्याजवळ आज सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास एसटी महामंडळाची (Lonavala accident) बस व दुचाकी गाडी यांच्यात अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील तीन महिला जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी लोणावळ्यातील परमार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Pune : गौण खनिजाची वाहतूक करताना ताडपत्रीचे आच्छादन करा

यापैकी एका महिलेच्या पायाला गंभीर मार लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदरची बस क्र. MH 20 BL 3330 ही परळ डेपोची बस पिंपळगावरोठा येथून कुर्ल्याकडे (Lonavala accident) लोणावळ्याच्या दिशेने निघाली होती तर दुचाकी गाडी समोरुन येत होती. जखमी महिला ह्या नांगरगाव भागातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.