Chinchwad : जगताप, कलाटे, भोंडवे, भोईर यांनी नेले उमेदवारी अर्ज

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजप शहराध्यक्ष विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांनी उमेदवारी अर्ज नेला आहे. शिवसेना गटनेते राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, भाऊसाहेब भोईर यांच्यासह आज (सोमवारी) 15 जणांनी 39 अर्ज नेले आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यास केवळ तीनच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे इच्छुकांची अर्ज नेण्याची लगबग सुरु झाली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी चार अर्ज नेले आहेत. तर, महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी देखील चार अर्ज नेले आहेत.

राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, भाऊसाहेब भोईर, प्रशांत शितोळे यांनी देखील प्रत्येकी चार उमेदवारी अर्ज नेले आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी आजपर्यंत एकूण 24 जणांनी  54 उमेदवारी अर्ज नेले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.