Jayashree Jadhav : जयश्री जाधव यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ

एमपीसी न्यूज : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव (Jayashree Jadhav) या निवडून आल्या असून, त्यांचा शपथविधी सोहळा विधानभवन येथे आज झाला. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी जयश्री जाधव यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदामंत्री जयंत पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार नाना पटोले, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत तसेच संबंधित अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Nigdi News : अप्पूघर येथे 12D ‘सिनेमॅटिक राईड’चे आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन

पतीच्या जागी उमेदवारी – Jayashree Jadhav

12 एप्रिल रोजी होणाऱ्या कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने जयश्री जाधव यांना रिंगणात उतरवले होते. जयश्री जाधव या काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी. ही पोटनिवडणूक चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर त्यांच्या जागेसाठीच झाली. चंद्रकांत जाधव यांचा कोविड-19 मुळे गेल्या वर्षी मृत्यू झाला होता. ते पहिल्यांदाच आमदार झाले होते. त्यांनी शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला. आता शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सत्ताधारी आघाडीचा भाग आहेत.

Jayashree Jadhav takes oath of Assembly membership

क्षीरसागर 2014 च्या निवडणुकीत जिंकून विधानसभेत पोहोचले होते. तर, 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला. 2019 मध्ये काँग्रेसच्या उमेदवाराने त्यांचा 15 हजार 199 मतांनी पराभव केला होता. या पोटनिवडणूकीमध्ये 96 हजार 226 मत मिळवून जयश्री यांनी भाजपच्या सत्यजीत कदम यांचा 77 हजार 426 मतांनी पराभव केला. आज जयश्री जाधव या आपल्या पतीच्या स्थानी विराजमान झाल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.