12D Cinematic : अप्पूघर येथे 12D ‘सिनेमॅटिक राईड’चे आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज – निगडी येथील अप्पूघर मध्ये पर्यटकांसाठी नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित 12D सिनेमॅटिक (12D Cinematic) या राईडचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

सहशहर अभियंता सतीश इंगळे तसेच नामांकित वकील अजित कुलकर्णी, अप्पूघरचे संचालक डॉ. राजेश मेहता, कार्यकारी संचालक कृष्णा मेहता आदी उपस्थित होते. कामगारनगरी म्हणून नावारूपास आलेल्या शहरात अप्पुघर हे पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच पुणे जिल्हा तसेच राज्य, देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी मनोरंजनाचे एक नावाजलेले केंद्र आहे.

IMD : पुण्यात तीन दिवसाने बदलणार वातावरण; ढगाळ वातावरणाची शक्यता

डॉ. राजेश मेहता यांनी आजवर या अप्पुघर मध्ये सर्व वयोगटाचा विचार करून त्यांच्या करमणुकी संदर्भात प्राधान्यक्रम देत धडक गाडी, बलून राईड, मिनी ऑक्टोपस, भूत बंगला, जीरफ राईड, मेरी गो राऊंड, जम्पिंग फ्रॉग, अप्पू कोलंबस, अप्पू एक्सप्रेस, माय फेअर लेडी, गायडेड कार तसेच वॉटर पार्क पर्यटकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिले आहे. या सर्व (12D Cinematic) राईडची आयुक्त पाटील यांनी पाहणी करून समाधान व्यक्त करून पर्यटकांच्या दृष्टीने अनमोल सूचना देखील केल्या.

12 डी सिनेमाटीका (12D Cinematic) या राईट असा प्रत्यक्ष अनुभव घेतला. डॉ. राजेश मेहता यांनी या राईटच्या वैशिष्ट्ये सांगितले. या राईड मध्ये चित्तथरारक रोलर कॉस्टर, हेलिकॉप्टर, जंगल सफारी आधीचा प्रत्यक्ष बसल्या ठिकाणी आनंद उपभोगता येणार आहे. परंतु यासाठी कोणत्याही प्रकारचा धोका पत्करण्याची गरज नाही

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.