Pandit Sukhram Sharma : संवाद क्रांतीचे जनक पंडित सुखराम शर्मा यांचे निधन

एमपीसी न्यूज : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंडित सुखराम शर्मा (Pandit Sukhram Sharma) यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. ते ७ मेपासून दिल्लीच्या एम्समध्ये व्हेंटिलेटरवर होते.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखराम यांना ४ मे रोजी ब्रेन स्ट्रोक झाला होता. प्रथम त्यांना हिमाचल प्रदेशातील मंडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना एअरलिफ्ट करून दिल्ली एम्समध्ये नेण्यात आले.

पंडित सुखराम शर्मा यांना संवाद क्रांतीचे (Pandit Sukhram Sharma) जनक मानले जात होते. भारतात मोबाईल कॉल करणारे ते पहिले व्यक्ती होते. त्यांना पंडितजी म्हणूनही ओळखले जायचे. केंद्रातील नरसिंहराव सरकारमध्ये 1993 ते 1996 या काळात ते देशाचे माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण मंत्री होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात दूरसंचार क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी खुले करण्यात आले.

Pandit Shivkumar Sharma : प्रख्यात संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन

ते हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून लोकसभा खासदार होते. पंडित सुखराम यांनी पाच वेळा विधानसभा आणि तीन वेळा लोकसभा निवडणूक जिंकली. 2011 मध्ये त्यांना  पाच वर्षांची शिक्षाही झाली होती. 1996 मध्ये दळणवळण मंत्री असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.