Bhosari crime : बसमध्ये चढणाऱ्या महिलेचे दिड लाखाचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज – बसमध्ये चढत असताना महिलेच्या पर्स मधून चोरट्याने दीड लाखांचे दागिने चोरून नेले आहेत.हा प्रकार मंगळवारी (दि.25) दुपारी भोसरी पी.एम.टी.बस स्टॉपवर घडली. (Bhosari crime) महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune news : अधिकाधिक नागरिकांना बँकींग व्यवस्थेत आणा- केंद्रीय सहसचिव पंकज शर्मा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या भोसरी पीएमटी बस स्थानाकावर बसमध्ये चढत असताना चोरट्याने गर्दीचा फायदा घेत फिर्यादी यांच्या पर्समध्ये ठेवलेले दागिन्यांचे पाकीट लंपास केले.(Bhosari crime) त्यामध्ये एकूण 1 लाख 45 हजार रुपयांचे दागिने होते. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.