Jitendra Awhad Breaking News : जितेंद्र आव्हाड यांचा जयंत पाटील यांच्याकडे राजीनामा

एमपीसी न्यूज : ठाण्याचे राष्ट्रवादी पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad Breaking News) यांच्या संकटात पुन्हा वाढ झाली आहे. त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून ठाण्यात जाळपोळ करण्यात आली असून, जितेंद्र आव्हाड यांनी जयंत पाटील यांच्याकडे राजीनामा दिला आहे.

हा गुन्हा भाजपच्या महिला पदाधिकारी यांनी दाखल केला आहे. यावरून ठाण्यात राजकारण चांगलेच तापले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटले आहे, की खुनाचा आरोप परवडला पण विनयभंगाचा आरोप नको असे म्हणत आपला राजीनामा दिला आहे.

माझ्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवताना आयपीसी 354 कलम लावले. हे माझ्या मनाला लागले. समाजामध्ये माझी बदनामी व्हावी, यासाठीच हा षडयंत्राचा भाग आहे. इतक्या खालच्या पातळीचा राजकारण होऊ नये, घरे उद्धवस्त होतील असेही आव्हाड यांनी राजीनामा देते वेळी म्हंटले. तर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी राजीनामा देण्यासारखे काही झाले नसल्याचे म्हंटले आहे. तसेच हा षडयंत्र रचल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.

Lighthouse Project : लाईटहाऊस प्रकल्पामुळे दीड वर्षात 374 गरजू लोकांना मिळाली नोकरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हंटले, की मी तातडीने सांगलीतून मुंबईकडे धाव घेतली. मी इथे जितेंद्र आव्हाड यांची समजूत काढण्यासाठी आलो आहे. त्यांच्यावर दाखल झालेला विनयभंगाचा गुन्हा हा चुकीचा आहे. यावेळी मुख्यमंत्री तिथे होते. माझे मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेले नाही पण मी मुख्यमंत्र्यासोबत बोलणार आहे. तेच सांगतील नेमके काय घडले आहे.

यावरून आता ठाण्यात तनावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.