Lighthouse Project : लाईटहाऊस प्रकल्पामुळे दीड वर्षात 374 गरजू लोकांना मिळाली नोकरी

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (Lighthouse Project) लाईटहाऊस प्रकल्पामुळे दीड वर्षात 374 गरजू लोकांना नोकरीं मिळाली आहे, अशी माहिती मनपाचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी दिली आहे.

पुणे महानगरपालिका हद्दीत ‘पुणे सिटी कनेक्ट डेव्हलपमेंट’ ही संस्था पुणे महानगरपालिकेच्या समन्वयाने लाईट हाऊस प्रकल्प राबवत असून, या प्रकल्पांतर्गत 18 ते 30 वयोगटातील युवक योजना मोफत प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पुणे महानगरपालिकेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या समन्वयाने पिंपरी चिंचवड मनपा हद्दीत हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

या प्रकल्पाची सुरुवात 25 मार्च 2021 रोजी करण्यात आली आहे. हा प्रकल्प पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील सावित्रीबाई फुले स्मारक इमारतीत राबविण्यात येत आहे.

एकूण 942 जणांची या प्रकल्पांतर्गत नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी 782 जणांनी कोर्स पूर्ण केलेले असून 327 जणांना नोकरी मिळालेली आहे. कोर्स पूर्ण केलेल्या 41.81 टक्के लोकांना नोकरी मिळाली आहे. 374 जणांचे कोर्स चालू आहेत.

Student health Program : विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी ‘संकल्प संपूर्ण स्वास्थ्य’ कार्यक्रम

इंदलकर म्हणाले, की लाईटहाऊस प्रकल्पाचे कोर्सेस (Lighthouse Project) मनपामार्फत मनपाच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन कार्यालय, चिंचवड आणि निगडीमधील सेक्टर 21 येथील महिला व बालकल्याण केंद्रामध्ये सुरु करण्यात येतील. या ठिकाणच्या स्थापत्य विषयी टेंडर कामकाज चालू आहे. तसेच, भविष्यात प्रत्येक प्रभागामध्ये एक लाईट हाऊस सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे आठ प्रभागांमध्ये आठ लाईट हाऊस सुरू करण्यात येतील.

लाईट हाऊस प्रकल्पाचे वैशिष्ट्य – 

  1. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विभागाच्या योजना विकास विभाग व पुणे सिटी कनेक्ट डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्यासाठी तुम्ही प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

2. महापालिका क्षेत्रातील वय वर्षे 18 ते 30 या वयोगटातील महिला, मुले, व शाळाबाह्य विद्यार्थी यांच्याकरिता पुणे सिटी कनेक्ट फाउंडेशन यांच्यामार्फत मोफत प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे.

3. पुणे सिटी कनेक्ट डेव्हलपमेंट फाउंडेशन सीएसआरच्या (कॉर्पोरेट सोशल रेस्पोंसिबिलिटी) माध्यमातून प्रकल्प खर्च करिता निधी उभारू शकतो.

4. पुणे सिटी कनेक्ट फाउंडेशन प्रत्येक लाईट हाऊस करिता स्वतंत्रपणे कर्मचारी वर्गाची नेमणूक करतो.

5. पुणे सिटी कनेक्ट डेव्हलपमेंट फाउंडेशन यांना या उपक्रमाकरिता लोकसहभाग मिळवून देणे, लाभार्थी मिळवून देण्याकरिता नागरवस्ती विकास योजना विभागाकडील समूह संघटक हे सहाय्यता करतात.

6. सहाय्यक आयुक्त नागरवस्ती विकास योजना विभाग हे या उपक्रमाचे समन्वय अधिकारी आहेत.

7. महापालिकेच्या वतीने प्रत्येक लाईट हाऊस करिता सोयी सुविधा उदाहरणार्थ कार्यालयाची जागा, आयटी इन्फ्रास्ट्रक्चर – संगणक, प्रिंटर स्कॅनर फोटोकॉपीयर, प्रोजेक्टर आणि स्क्रीन, व्हिडिओ वॉल, सीसीटीव्ही कॅमेरे, यूपीएस बॅकअप जनरेटर नेटवर्किंग सर्वर, केबलिंग आणि इतर आवश्यक तांत्रिक इन्फ्रास्ट्रक्चर करण्यात येत आहे.

कोर्सेस –

1. 22 दिवसांचा व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा किंवा फाउंडेशन कोर्स.

2. स्पोकन इंग्लिश कोर्स.

3. आपल्या शिक्षणानुसार व कलानुसार 80 स्किलड कोर्समधून कोर्स निवडून पूर्ण करणे.

4. नोकरी, व्यवसायाच्या संधीबाबत पूर्ण मार्गदर्शन.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.