Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना आता अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. रिदा रशीद यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यानंतर आव्हाड यांनी जयंत पाटील यांच्याकडे राजीनामा दिला होता.

विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे कोर्टात धाव घेतली होती तसेच अटकपूर्व जामिनासाठी अर्जही केला होता. त्यानंतर न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांनी म्हंटले आहे, की खुनाचा आरोप परवडला पण विनयभंगाचा आरोप नको असे म्हणत आपला राजीनामा दिला आहे.

Women molestation : महिलेचा विनयभंग करणाऱ्या दोघांना अटक

माझ्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवताना आयपीसी 354 कलम लावले. हे माझ्या मनाला लागले. समाजामध्ये माझी बदनामी व्हावी, यासाठीच हा षडयंत्राचा भाग आहे. इतक्या खालच्या पातळीचा राजकारण होऊ नये, घरे उद्धवस्त होतील असेही आव्हाड यांनी राजीनामा देते वेळी म्हंटले. तर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी राजीनामा देण्यासारखे काही झाले नसल्याचे म्हंटले आहे. तसेच हा षडयंत्र रचल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.