Women molestation : महिलेचा विनयभंग करणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – भावाला शिवीगाळ, धमकी देत असताना भांडण सोडविण्यासाठी महिला मध्ये गेली असता दोघांनी महिलेसोबत गैरवर्तन (Women molestation) करून तिचा विनयभंग केला. हा प्रकार रविवारी (दि. 13) रात्री बावधन खुर्द येथे घडला.

याप्रकरणी पीडित 28 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन गणेश पाटील (वय 28) , गणेश बनसोडे (वय 23, दोघे रा. बावधन, ता. मुळशी) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

Pune murder : पुण्याच्या हडपसर परिसरात सुरक्षारक्षकाचा खून, घटनेनंतर संपूर्ण शहरात खळबळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या ओळखीचा आरोपी सचिन पाटील हा फिर्यादींच्या भावाच्या घरी आला. त्याने फिर्यादीच्या भावाला शिवीगाळ करून धमकी दिली. (Women molestation) हा प्रकार सुरु असताना भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी गेल्या. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी सोबत गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. या झटापटीत फिर्यादीच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटून नुकसान झाले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.