Jitendra Awhad: घरबसल्या पैसे कमवा ! संध्याकाळी पेट्रोल-डिझेल घ्या, सकाळी विका

jitendra awhad slams on modi government on petrol diesel rates hikes गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. पहिल्यांदाच डिझेलचा दर हा पेट्रोलपेक्षा जास्त झाला आहे. त्यामुळे मोदी सरकारला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

एमपीसी न्यूज- इंधन दरवाढीवरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत खोचक टोला लगावला आहे. आव्हाड यांनी ट्विटरवरून मोदी सरकारवर उपरोधिकपणे निशाणा साधताना म्हटले आहे की, घरबसल्या पैसे कमवा…संध्याकाळनंतर पेट्रोल-डिझेल विकत घ्या आणि सकाळी विका. आत्मनिर्भर व्हा.

आव्हाड यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवर ही पोस्ट टाकली आहे. सोबत एक मॉर्फ केलेला फोटोही पोस्ट केला आहे. या फोटोत पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोस्टर असून त्यावर ‘अक्कड बक्कड बंबे बो, 80, 90 पूरे 100’ असं लिहिलं आहे. तसेच देशाचा जीडीपी G- Gas, D-Diesel, P- Petrol वाढतोय, असा खोचक टोलाही त्यांनी मोदी सरकारला लगावला आहे.


गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. पहिल्यांदाच डिझेलचा दर हा पेट्रोलपेक्षा जास्त झाला आहे. त्यामुळे मोदी सरकारला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.


युपीए सरकारच्या वेळी इंधन दरवाढीच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या हेमामालिनी यांना देखील मोदी सरकारच्या काळात इंधन दरवाढीमुळे प्रवासासाठी शोले चित्रपटातील धन्नोचा पर्याय योग्य वाटत असल्याची खोचक टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.