Pimpri : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या शहर-जिल्हा अध्यक्षपदी जितेंद्र कुलकर्णी

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पिंपरी-चिंचवड शहर-जिल्हा अध्यक्षपदी जितेंद्र कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती 3 वर्षांसाठी आहे.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या प्रदेशाध्यक्षा मोहिनीताई पदकी यांनी कुलकर्णी यांना नियुक्तीपत्र दिले. सर्व जुन्या- नव्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून  लवकरच महासंघाची शहर-जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

नवनियुक्त अध्यक्ष जितेंद्र कुलकर्णी हे गेली सात वर्षे बांधकाम व्यवसायात तसेच सीएनजी तंत्रज्ञान प्रशिक्षण क्षेत्रात २८ वर्षे कार्यरत आहेत. गेली 12 वर्षे ब्राह्मण समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी ते काम करीत आहेत. कुलकर्णी हे ‘बॉण्ड’ या संस्थेचे संस्थापक तर ब्राह्मण बिझनेस नेटवर्क (BBN) या संस्थेचे सहसंस्थापक आहेत. यापूर्वी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघांचे 2014 – 2015 या वर्षी पिंपरी-चिंचवड शहर सरचिटणीस म्हणून केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांची महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. 2016 मध्ये त्यांना प्रदेश सरचिटणीस म्हणून पदोन्नती देण्यात आली. कुलकर्णी यांचे संघटन कौशल्य लक्षात घेऊन त्यांच्यावर आता पिंपरी-चिंचवड शहर-जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

खास विचार करून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष पदावरती नियुक्ती करण्यात आली आहे. लोणावळा, वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे, आळंदी, चाकण, राजगुरूनगर, मंचर या सर्व विभागांना जोडणारा पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा  महासंघाच्या संघटनात्मक दृष्टीने विशेष महत्त्वाचा मानला जातो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.