Pune : पुण्यातील भिडे वाडा येथे  तात्याराव भिडे यांचा अर्धपुतळा उभारावा, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची मागणी

एमपीसी न्यूज –  देशातील पहिली मुलींची शाळा 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडे ( Pune) वाडा येथे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी सुरू केली, ही शाळा सुरू करण्यासाठी ज्यांनी सर्व समाजाचा विरोध झुगारून आपला राहता वाडा महात्मा फुलेंना शाळेसाठी दिला. त्या श्री तात्याराव भिडे यांचा पुतळा पुणे येथे निर्माण होणाऱ्या महात्मा फुले स्मारकाच्या प्रांगणात उभारण्यात यावा अशी मागणी, पुणे जिल्हा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे, उपमुख्यमंत्री  देवेंद्र  फडणवीस व पुण्याचे पालकमंत्री अजित पावर यांच्याकडे करण्यात आली आहे.

Sangvi : आई आणि बहिणीला मारहाण केल्याप्रकरणी मुलगा आणि सुनेवर गुन्हा दाखल

ही मागणी महासंघाने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी  ट्वीटरद्वारे केलीआहे. यासाठी एक निवेदन देखील पुणे जिल्हा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने काढले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की,  समाजाचा विरोध झुगारून आपला राहता वाडा महात्मा फुलेना शाळेसाठी दिला, त्यामुळे त्यांचे देखील स्मरण येथे व्हावे.
यासाठी तात्यारावांच्या या उदारमतवादी विचारांचा माहिती फलक त्यांच्या पुतळ्याशेजारी लावण्यात यावा जेणेकरून जगाला या अनोख्या त्यागाची कल्पना येईल अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली. याचा योग्य पाठपुरावा घेण्यात येईल असे महासंघाकडून सांगण्यात आले ( Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.