Juni Sangvi : दारू पिऊन घाण का करता म्हणून हाटकले म्हणून गर्दुल्यांनी ज्येष्ठ नागरिकाला केली मारहाण

एमपीसी न्यूज – मोकळ्या जागेत रोज दारू पिऊन (Juni Sangvi )व गुटखा खाऊन घाण का करता असे हाटकले म्हणून ज्येष्ठ नागरिकाला तीन ते चार गर्दुल्यांनी मारहाण केली आहे. ही घटना सोमवारी (दि.11) जुनी सांगवी येथील एका मोकळ्या जागेत घडली.

याप्रकरणी नारायण आत्माराम ढोरे (वय 61 रा.जुनी सांगवी) (Juni Sangvi )यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी ओंकार योगेश पिंपरे, निरंजन योगेश पिंपरे, योगेश पिंपरे सर्व रा. जुनी सांगवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Chikhali : नागरिकांच्या मागणीला यश, हॉर्स रायडिंग प्रशिक्षण केंद्र दुसरीकडे शिफ्ट करणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनी सांगवी येथील एका मोकळ्या जागेत आरोपी हे रोज दारु पिऊन व गुटखा खाऊन घाण करतात. यावेळी फिर्यादी यांनी त्यांना येथे घाण का करता म्हणून हटकले. याचा राग येवून त्यांनी फिर्यादी यांना लाकडी बांबूने व हाताने मारहाण करत शिवीगाळ केली. यावरून सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलूस पुढील तपास करत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.