Chikhali : नागरिकांच्या मागणीला यश, हॉर्स रायडिंग प्रशिक्षण केंद्र दुसरीकडे शिफ्ट करणार

एमपीसी न्यूज – मोशी, चिखली येथील रिव्हर रेसिडन्सी येथील(Chikhali) मैदान खेळण्यासाठी राखीव ठेवण्याच्या नागरिकांच्या मागणीला यश आले आहे. या मैदानावरील हॉर्स रायडिंग प्रशिक्षण केंद्र दुसरीकडे शिफ्ट करण्याचे आश्वासन महापालिकेने दिले आहे. त्यानंतर ठाकरे गटाच्या आघाडीच्या उपसंघटिका रुपाली आल्हाट यांनी आपले उपोषण मागे घेतले.

चिखलीतील 1 हेक्टर जागा महापालिकेने सन 2005 साली (Chikhali)खेळाच्या मैदानासाठी आरक्षित केली होती. 15 हजार 600 चौरस मीटर भूखंड सन 2010 मध्ये टीडीआरच्या मोबदल्यात मूळ मालकाकडून महापालिकेच्या ताब्यात आला. मैदानालगत सीमाभिंत बांधून हे मैदान नागरिकांसाठी खुले करण्यात आले.

या परिसरात मोठ-मोठे गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. या गृहसंस्थांमधील आबालवृद्ध या मैदानाचा वापर चालणे, धावणे, कवायत करणे, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन आदीसांठी करत होते.

Pune : मोदी, शहा, फडणवीस शिवसेनेच्या टार्गेटवर

आयुक्तांनी नागरिकांच्या हक्काचे मैदान सर्व विरोध डावलून थेरगाव येथील कृष्णा सामाजिक सेवा प्रतिष्ठान या संस्थेला हॉर्स रायडिंगसाठी करारपद्धतीने ठराव करुन चालविण्यास मोफत दिले होते. ही संस्था हॉर्स रायडिंगसाठी प्रतिव्यक्ती आठ ते दहा हजार रुपये शुल्क आकारणार असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. नागरिकांनी तीव्र विरोध केला होता. मोशी-चिखली येथील रिव्हर रेसिडन्सी श्रीराम चौकात उपसंघटिका रुपाली आल्हाट उपोषणाला बसल्या होत्या. या मैदानाचा प्रश्न विधीमंडळातही गाजला.

अखेरिस तसेच प्रशिक्षण केंद्र अन्यत्र हलविण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येत आहे. यासाठी नवीन जागेच्या शोध घेऊन ती विकसित करण्यासाठी दिड ते दोन महिन्याचा कालावधी लागेल, असे आश्वासन प्रशासनाने दिले. त्यामुळे आल्हाट यांनी उपोषण मागे घेतले. दरम्यान, या निर्णयाविरोधात मनसेनेही आंदोलन केले होते.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.