Pune : मोदी, शहा, फडणवीस शिवसेनेच्या टार्गेटवर

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी,(Pune) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेच्या टार्गेटवर असतील, तशा प्रकारचे संकेत पुण्यातील शिवसेना मेळाव्यात देण्यात आले.

आगामी काळात पुण्याचा खासदार शिवसेनेचा असेल आणि 3 आमदार, पुणे महापालिकेत 50 नगरसेवक, अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागण्याचे आदेश शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत.

भाजपने शिवसेना फोडल्याचा घाव उध्दव ठाकरे (Pune)यांच्या जिव्हारी लागला आहे. शिवसेना फोडण्याचे पाप फडणवीस तुम्ही केल्याने तुम्हाला नरकात सुद्धा जागा मिळणार नसल्याचे राऊत यांनी पुण्यात निक्षून सांगितले.

बाळासाहेब अमर आहेत, शिवसेना अजिंक्य आहे. शिल्लक शिवसेना काय आहे हे पाहण्यासाठी फडणवीस तुम्ही बघा. तुमच्याकडे केवळ कचराच गेलाय. आम्हाला शिल्लक शिवसेना म्हणताय, तुम्ही 2024 मध्ये शिल्लक राहणार नाहीत.

PMRDA : रिंगरोड मार्गी लागणार; वडगाव शिंदेमध्ये  मोजणी सुरु

आपल्याला, देशाला लागलेली पणवती 2024 मध्ये गेली असेल. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे नरेंद्र मोदी टिकले. 5 राज्यात त्यांना विजय मिळाला. महागाई, बेरोजगारी आहे. सर्व एजन्सीला भाजपाचा पराभव होण्याचे सांगत होते. ईव्हीएमचा हा विजय आहे. 1 निवडणूक ब्यालेट पेपरवर घेऊन दाखवा. पुणे महापालिका निवडणुक तरी घ्या. 10 वर्षांत काय ग्यारंटी दिली. 15 लाखांच्या ग्यारंटीचे काय झाले.

भ्रष्टाचारांना फासावर लटकवू सांगितले होते. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, राहुल शेवाळे, प्रताप सरणाईक, भावना गवळी यांचे काय झाले. जम्मूत आजही हजारो पंडित बाळासाहेब यांचे चित्र लावून जगतायेत. अरबी समुद्रात शिवाजी महाराज यांचे स्मारक करणार होते, त्याचे काय झाले, शिवसेनेला घाबरून तुम्ही फोडण्याचे काम केले. महाराष्ट्रातील सर्व व्यवसाय गुजरातला आणि तेथून ड्रग्स महाराष्ट्रात पुण्यात आणला जात आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.