Jotiraditya Scindia: ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले…सत्यापेक्षा खोट्या बातम्या वेगाने पसरतात, हे दुःखदायक!

Jyotiraditya Scindia said ... Sadly, False news travels faster than truth!

एमपीसी न्यूज – भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया पुन्हा एकदा चर्चेत आहेत. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलची ओळख बदलली असल्याची बातमी सोशल मीडियामध्ये व्हायरल आहे. या प्रस्तावनेत त्यांनी भाजपाचा संदर्भ न घेता केवळ जन सेवक आणि क्रिकेटप्रेमी लिहिले आहेत. त्यामुळे कदाचित ते भाजपावर नाराज आहेत आणि आता ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या. ही गोष्ट इतकी पसरली की सिंधिया यांना ट्वीट करून त्याचे खंडन करावे लागले… सत्यापेक्षा खोट्या बातम्या वेगाने पसरतात, हे दुःखदायक आहे.

सिंधिया यांच्याबरोबर काँग्रेस सोडणारे त्यांचे समर्थक मध्य प्रदेशात होत असलेल्या भाजपच्या वाढीवर खूष नाहीत. सिंधियासमवेत राजीनामा देणारे मंत्री अजूनही नव्याने मंत्री होण्याच्या प्रतीक्षेत आहेत, पण मंत्रिमंडळ विस्तार सातत्याने लांबणीवर जात आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दर काही दिवसांनी नवीन तारीख सांगतात, त्यामुळे मंत्रिमंडळ तयार होणे त्यांच्या प्राथमिकतेत नसल्याचे दिसते.

यापूर्वी सिंधिया समर्थक मंत्री आणि त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे. या सर्वांना आगामी काळात निवडणुका लढवाव्या लागतील आणि ते मंत्री झाले नाहीत तर ते त्या दिमाखात त्यांच्या मतदारसंघात जाऊ शकणार नाहीत. अशा परिस्थितीत सिंधियाने आपल्या ट्विटर हँडलचा फोटो बदलला ज्यामध्ये त्यांच्या गळ्यात काँग्रेसचे उपरणे दिसत होते. त्यातूनच, या बातमीला पंख मिळाले की, त्यांनी ट्विटरवरील आपल्या परिचयातून भाजपला दूर केले.

सत्य हे आहे की, काँग्रेस सोडल्यानंतरही त्यांनी आपल्या परिचयात भाजपाचा उल्लेख केला नाही. काँग्रेसच्या सोशल मीडियाने याविषयी मोहीम चालवली आणि महाराज नाराज असल्याची हवा लोकांनी पसरवली. काँग्रेस सोडण्यापूर्वी 25 नोव्हेंबर 2019 रोजी सिंधिया यांनी आपली ओळख बदलली होती आणि काँग्रेस सरचिटणीस ऐवजी जनसेवक लिहिले होते. आता सिंधियाने आपले मौन तोडले आहे आणि ट्विटरवर लिहिले आहे की,… सत्यापेक्षा खोट्या बातम्या वेगाने पसरतात, हे दुःखदायक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.