Pune Corona Update : शहरात आज 275 नवे कोरोनाबाधित, 259 जणांना डिस्चार्ज, सहा रुग्णांचा मृत्यू

In the city today, 275 new coronaviruses, 259 people discharged, six patients died

एमपीसी न्यूज – दिवसभरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 275  इतकी नोंद झाली. कोरोनामुक्त झालेल्या 259 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर कोरोनाबाधित सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून देण्यात आली.

सध्या पुण्यात ससून रुग्णालय, नायडू रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये मिळून व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांची संख्या 49  असून क्रिटिकल रुग्णांची संख्या 195 आहे. तसेच 1,649  संशयित रुग्णांची स्वॅब तपासणी करण्यात आली.

दिवसभरात पुणे शहरात 275 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. कोरोना आजारातून बरे झालेल्या 259 रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. तर कोरोनामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

मृतांमध्ये पुणे शहरातील तीन आणि ग्रामीण भागातील तीन रुग्णांचा समावेश आहे. या रुग्णांमध्ये दोन महिला आणि चार पुरुष असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

मृतांमधील 70  आणि 68 वर्षीय महिलांचा अनुक्रमे केईएम व डेक्कन येथील सह्याद्री रुग्णालयात मृत्यू झाला. मृत पुरुषांमध्ये तिघे जेष्ठ नागरिक तर एकजण तरुण आहे. या तरुणाचे वय 42  वर्ष असून, त्याचा मृत्यू पूना हॉस्पिटलमध्ये झाला.

यातील 66 वर्षीय जेष्ठाचा मृत्यू दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात, तर 80 आणि 84  वर्षीय जेष्ठाचा मृत्यू ससून रुग्णालयात झाला.

पुण्यातील आत्तापर्यंतची पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 7,722, तर अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 2,413 इतकी नोंदविण्यात आली आहे. शहरात एकूण मृत्यू 372 झाले आहेत. आजपर्यंत कोरोनमुक्त झालेल्या 4,934 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात या आल्याचे पुणे महापालिकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.