Kabaddi Tournament : स्व. शंकरराव उर्फ बुवा साळवी चषक विजेत्यांचा सत्कार

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, बाणेर- बालेवाडी, सूस व म्हाळुंगे आयोजित व बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशनच्या (Kabaddi Tournament) वतीने श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या बॉक्सिंग हॉलमध्ये सुरू असलेल्या स्व. शंकरराव उर्फ बुवा साळवी चषक पुरुष व महिला राज्यस्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धेत पुरूषांमध्ये चिपळूणच्या वाघजाई क्रीडा मंडळ तर महिलांमध्ये मुबंईच्या शिवशक्ती संघ स्व. शंकरराव उर्फ बुवा साळवी चषकाचा मानकरी ठरला.

या स्पर्धेचे पारितोषिक वितरण राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रतिभा पवार, विठ्ठलशेठ मनियार, मारुतराव धनकुडे, अंकुश काकडे, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच सरकार्यवाह अॅड. आस्वाद पाटील, उपाध्यक्ष शकुंतला खटावकर, सदस्य व स्पर्धा संयोजक बाबुराव चांदेरे, एस. एम. पटेल, मेहबुब शेख, मधुकर नलावडे, सुनिल गव्हाणे यांच्यासह स्पर्धा, संयोजन समिती अध्यक्ष समीर चांदेरे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्याध्यक्षा वासंती बोर्डे, सरकार्यवाह राजेंद्र आंदेकर, सहकार्यवाह योगेश यादव, दत्ता कळमकर, खजिनदार योगिराज टकले, स्पर्धा निरिक्षक भाऊसाहेब करपे, पंच प्रमुख आंतरराष्ट्रीय पंच दत्ता झिंजुर्डे, अनिल यादव यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

राज्यस्तरीय शंकरराव उर्फ बुवा साळवी (Kabaddi Tournament) चषक कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुरुष विभागात चिपळूणच्या वाघजाई क्रीडा मंडळ या संघाने नांदेडच्या बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशन संघावर 39-34 असा विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. मध्यंतराला वाघजाई क्रीडा मंडळ संघाकडे 28-19 अशी आघाडी होती. वाघजाई संघाच्या अजिंक्य पवार याने चौफेर चढाया करत बाबुराव चांदेरे फाऊंडेशन संघाचा बचाव भेदला. तर, शुभम शिंदे याने उत्कृष्ठ पकड घेतली. बाबुराव चांदेरे फाऊंडेशन संघाच्या सुनिल दुबीले याने जोरदार चढाया करत चांगला प्रतिकार केला व सामन्यात चुरस निर्माण केली. गुरूनाथ मोरे याने चांगल्या पकडी घेतल्या.

Chandrakant Patil : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यास सज्ज व्हा…

महिलांच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या सिवशक्ती संघाने पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघावर 32-26 असा विजय मिळवित स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. मध्यंतराला शिवशक्ती संघाकडे 14-13 अशी निसटती आघाडी होती. शिवशक्ती संघाच्या अपेक्षा टाकळे व सोनाली शिंगटे यांनी चौफेर चढाया करत मैदानावर हुकमत गाजवत संघाला विजय मिळवून दिला. त्यांना रक्षा नारकर व रेखा सावंत यांनी चांगल्या पकडी घेत आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अपेक्षा टाकळे व सोनाली शिंगटे यांनी सामन्याच्या सुरुवातीपासुनच आक्रमक खेळ करीत राजमाता जिजाऊ संघाला दबावात ठेवण्यात यश मिळविले.

त्याचा परिणाम राजमाता जिजाऊ संघाला (Kabaddi Tournament) पराभवाला सामोरे जावे लागले. राजमाता जिजाऊ संघाच्या मंदिरा कोमकर व सायली केरीपाळे यांनी जोरदार चढाया करीत चांगला प्रतिकार केला. अंकिता जगताप व स्नेहल शिंदे यांनी चांगल्या पकडी घेतल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.